पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण अलिकडे खूपच वाढत चालले आहे. यामुळे अकाली वद्धत्व आल्यासारखी व्यक्ती दिसू लागते. म्हणून केसांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. मात्र, अनेकदा कामाच्या व्यापामुळे केसांकडे दुर्लक्ष होते. कामाचा ताण आणि प्रदूषण हे केस पांढरे होण्यामागील मुख्य कारण आहे. काहीजण केस पांढरे झाल्यास कलर करतात. मात्र, हा एकमात्र उपाय नसून काही घरगुती उपचार केल्यास पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात.

हे आहेत १२ उपाय

 •  पेरूच्या पानांची पेस्ट करून केसांना लावल्यास ही समस्या दूर होते.
 •  केस धुण्यापूर्वी ऐलोवेरा जेलने केसांची मसाज केल्यास केस काळे होतील.
 •  २५० ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये मेंदीची पाने उकळून त्यानंतर तेल गाळून बाटलीत भरून ठेवा. हे तेल दररोज रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावावे.
 •  आवळ्याचे काही तुकडे काळे होईपर्यंत नारळाच्या तेलात उकळवावेत. हे तेल दररोज केसांना लावल्यास पांढरे केस काळे होतील.
 •  अर्धा कप दह्यामध्ये चिमुटभर काळे मिरे आणि चमचाभर लिंबाचा रस मिसळून केसांवर लावावे.
 •  दररोज साजुक तुपाने डोक्याची मालिश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
 •  आले मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस गाळून घ्यावा. आल्याच्या रसामध्ये मध मिसळून हे मिश्रण केसांना लावावे. एक तासानंतर केस धुवून घ्यावेत. वारंवार हा उपाय केल्यास कमी वयात पांढरे झालेले केस काळे होतात.
 •  कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवावी. नंतर केस धुवून घ्यावेत. असे केल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.
 •  दूध अथवा दह्यात बेसन पीठ घालून केसांवर लावल्याने चांगला फरक पडतो.
 •  भोपळा वाळवून नारळाच्या तेलात उकळून घ्यावा. हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवून दररोज मसाज करावा.
 • दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.
 •  तीळ खावेत तसेच तीळाचे तेल केसांना लावावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु