असा ओळखा तुमचा ‘स्किन टाईप’

असा ओळखा  तुमचा ‘स्किन टाईप’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार माहित असणे खूप महत्वाचे आहे. सामान्यतः कोरडी (ड्राय), सामान्य (नॉर्मल), तेलकट (ऑइली) आणि मिश्र (कॉम्बिनेशन) असे त्वचेचे चार प्रकार आहेत. बऱ्याच वेळा अनेक लोकांना त्वचेचा प्रकार कळत नाही. आपली त्वचा नेमकी कुठल्या प्रकारातली आहे हे जाणून घेण्यासाठी टिश्‍यूने टेस्ट करून पहा.

असा ओळखा ‘स्किन टाईप’ –
१)
आपल्या त्वचेचा प्रकार ओळखण्यासाठी सकाळी एक टिश्‍यू घ्या आणि त्याने चेहरा साफ करा. जर तुमचा टिश्‍यू साफ राहिला तर तुमची त्वचा नॉर्मल आहे. नॉर्मल स्किनचा पृष्ठभाग हा मऊ, गुळगूळीत असतो. या प्रकारच्या त्वचेत तेल व आर्द्रतेचा समतोल अचूक असतो. यामुळेच अशी त्वचा जास्त आर्द्र किंवा जास्त शुष्कही नसते.
असा ओळखा  तुमचा ‘स्किन टाईप’
२) जर टिश्‍यूवर तेलकट डाग दिसले तर तुमची त्वचा तेलकट आहे. या त्वचेमध्ये तेलकट व कोरडेपणा हे दोन्ही प्रकार दिसून येतात. तेलकट त्वचेचा पृष्ठभाग जास्त तेलयुक्त असल्याने त्यावर वातावरणातील धुळ व माती जास्त प्रमाणात त्वचेवर चिकटते.
असा ओळखा  तुमचा ‘स्किन टाईप’
३) कॉम्बिनेशन स्किनचा प्रकार ओळखण्यासाठी चेहऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी टिश्‍यूने टेस्ट करून पहावी लागेल. कपाळ, नाक आणि हनुवटीसाठी एक टिश्‍यू घ्या आणि गालासाठी दुसरा टिश्‍यू घ्या. कॉम्बिनेशन स्किनमध्ये कपाळ, नाक आणि हनुवटीवर साधारण तेलकटपणा असतो आणि गाल ड्राय असतात. किंवा कपाळ, नाक आणि हनुवटी ड्राय असते आणि गालावर तेलकटपणा असतो.

असा ओळखा  तुमचा ‘स्किन टाईप’

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु