परफेक्ट ‘काजळ’ लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

परफेक्ट ‘काजळ’ लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी ‘काजळ’ फार महत्वाची भूमिका बजावते. काजळ लावणे ही एक कलाच आहे. काजळ हा दैनंदिन मेकअपचा भाग झाला आहे. मात्र हेच काजळ लावताना जराही फसले तर पूर्ण मेकअप बिघडू शकतो.

व्यवस्थित काजळ लावण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

१) काजळ लावण्यापूर्वी चेहरा टोनरने स्वच्छ करा. यामुळे डोळ्यांच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नाहीसे होईल.

२) अनेक रंगाचे काजळ बाजारात उपलब्ध आहेत मात्र काळ्या रंगाच्या काजळामुळे डोळे अगदी उठून दिसतात.

३) नेहमी वाटर प्रुफ काजळाचा वापर करा. हे काजळ पसरत नाही तसेच खूप काळ टिकते.

४) काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने थोडी पावडर लावा.

५) काजळ लावण्यापूर्वी आयलाईनर लावा.

६) काजळ डोळ्यांना आतून-बाहेरून लावल्यास काजळ योग्य दिशेने लागते आणि ते डोळ्यांभोवती पसरत देखील नाही.

७) अनेकांच्या पापण्यांजवळ तेलकटपणा असतो, त्याने काजळ लवकर पसरते, अशा वेळी कापसाच्या बोळ्याने ते तेल पुसून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु