‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – महिलांचे केस गळण्यामागे अनेक कारणे असतात, पण काहीवेळा हा आजारपणाचा संकेत असू शकतो. या संकेताकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. प्रथम पासूनच सावध झाल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. केसाची समस्या दूर करायची असल्यास समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा ही समस्या दूर होण्याऐवजी वाढत जाऊन आणखी गुंतागुंतीचे होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

केस गळण्याची समस्या ही तणाव, चयापचयसंबंधी तक्रारी, मधुमेह आणि शरीरात लोहतत्त्वाच्या कमतरतेने निर्माण होते. लोहतत्त्व केसांसाठी आरोग्यदायी असते. केस वाढीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ते रेस्टिंग पिरियडमध्ये जात असल्यास केसाचा विकास होत नाही. अशाने केस अवेळी गळू लागतात. परिणामी केस विरळ होत जातात. तसेच फीमेल पॅटर्न बाल्डनेस ही समस्या अनुवांशिक स्वरूपाची आहे. परंतु रजोनिवृत्तीनंतर महिलांना या समस्येचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो. या काळात शरीरात अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन्सच्या अनियमितपणामुळे असे होते. ही समस्या महिलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात दिसून येते. भांग पाडत असलेल्या ठिकाणी किंवा त्याच्या आसपासच्या भागातील केस कमी होतात.

बाल्ड पॅचेस ही सुद्धा एक केसाची समस्या आहे. जेव्हा डोक्याच्या कोणत्याही भागातील केस गळल्यामुळे त्वचेवर नाण्याच्या आकाराचा भाग मोकळा दिसू लागतो तर त्याला बाल्ड पॅचेस म्हणतात. एखादा संसर्ग किंवा तणावाने पीडित असल्यास शरीराच्या सुरक्षा पेशी हेअर फॉलिकल्सवर हल्ला करू लागतात. अशा स्थितीत हेअर फॉलिकल्स केसांची वाढ होण्याची प्रक्रिया कायम स्वरूपात प्रभावी करतात. ही प्रक्रिया कोणत्याही वयात घडू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु