‘हे’ 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या

‘हे’ 13 उपाय करा आणि झटपट मिळवा लांब केस ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम –

1) एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड यांचे  मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण केसांना लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या. त्यानंतर केस थंड पाण्यानेच धुवून घ्या.

2) खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात आणि त्यांची लवकर वाढ होते.

3) दही केसांच्या मुळांशी लावून 15 मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.

4) मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा. हा प्रयोग रोज केला तरी चालेल.

5) एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या.  थंड झाल्यानंतर  केसांवर लावून मसाज करा.

6) एका केळ्यामध्ये 4 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 चमचा मध घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि केसांना लावा.

7) एका बाऊलमध्ये अर्धा कप मध घ्या आणि त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा आणि केसांना लावा.

8) कांद्याचा रस केसांना लावा किंवा कांद्याचे तुकडे करुन केसांवर 12-15 मिनिटे घासा.

9) अर्धा लिटर खोबरेल तेलात 10 ग्रॅम कापूर मिसळून केसांना नियमित लावा.

10) 2 चमचे मध, 1 चमचा दालचिनी पावडरमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा.

11) काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा.

12) 1चमचा लिंबाचा रस 2 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावा.

13) कडिलिंबाची काही पानं घेऊन 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या. थंड झाल्यावर पाणी गाळून  घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु