घरातच उपलब्ध असलेल्या ‘या’ १५ पदार्थांनी धुवा केस, शाम्‍पू जाल विसरून

घरातच उपलब्ध असलेल्या ‘या’ १५ पदार्थांनी धुवा केस, शाम्‍पू जाल विसरून

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस अकाली पांढरे होणे, केसगळती यामुळे अनेक महिला आणि पुरूष त्रस्त असतात. यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, त्याचा अनेकदा काहीही उपयोग होत नाही. यावर काही घरगुती उपाय केल्याने चांगला फरक दिसून येतो. घरातीलच काही पदार्थ वापरून हे उपाय करता येतात. या पद्धतीने केस धुतल्याने ते चमकदार आणि दाट होतात.

हे आहेत उपाय

१. लिंबाचा रस
पाण्यात लिंबू मिसळून केस धुतल्याने स्वच्छ होतात. अतिरिक्त तेल निघून जाते. चमकदार होतात.

२. कढीपत्त्याचे पाणी
कढीपत्ता पाण्यात उकळून त्या पाण्याने केस निरोगी होतात.

३. केळी
केळी कुस्करून त्यामध्ये थोडासा मध मिसळून केसांवर लावा. पंधरा मिनिटांनंतर धुऊन घ्यावे. यामुळे केस चमकदार होतात.

४. बटाट्याचा रस
बटाट्याचा रस लावून १५ मिनिटांनंतर धुऊन घ्या. बटाट्यामध्ये स्टार्च आणि व्हिटॅमिन असतात जे केसांना सशक्त बनवतात.

५. अंडी
हे लावल्याने केसांमधून अतिरिक्त तेल दूर होते. केस स्वच्छ, केस आणि चमकदार होतात. हे नॅचरल कंडिशनर आहे.

६. बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून केसांवर लावल्याने अस्वच्छता आणि कोंडा दूर होतो. केसांतील अतिरिक्त तेलही निघून जाते.

७. चिंचेचे पाणी
रात्रभर चिंच भिजवून ठेवलेल्या पाण्याने केस धुतल्याने केस स्वच्छ होऊन कोंडाही निघून जातो.

८. कांद्याचा रस
केसांवर कांद्याचा रस लावा. १५ मिनिटांनंतर केस धुवून घ्या. यामुळे केस गळती आणि केस अकाली पांढरे होत नाहीत.

९. मध
यामुळे केस हायड्रेट राहतात. केसांना मध लावून २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या. यामुळे केस चमकदार होतात.

१०. अ‍ॅपल साइडर व्हिनेगर
अ‍ॅपल साइडर व्हिनेगर पाण्यात मिसळून केस धुतल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो. केस निरोगी होतात.

११. दही
यातील बायोटिनमुळे केसांची मुळेमजबूत होतात. केस दाट आणि चमकदार होतात.

१२. मक्याचे पाणी
मक्याचे दाने उकळून त्याच्या पाण्याने केस धुतल्याने ते निरोगी, चमकदार होतात.

१३. तांदळाचे पाणी
तांदळाच्या पाण्यात स्टार्च असल्याने या पाण्याने केस धुतल्याने मुलायम आणि चमकदार बनतात. यासोबतच दाट होतात.

१४. बेसन
बेसनमध्ये दही मिसळून केस धुतल्याने कोंड्यापासून सुटका मिळते. केस स्वच्छ होतात.

१५. टोमॅटो रस
यातील व्हिटॅमिन- ए मुळे केस सशक्त आणि मजबूत राहतात. केसांना लावून १५ मिनिटांनंतर धुऊन घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु