उपवासाच्या ‘या’ पदार्थाने चेहरा होईल गोरा! केस होतील काळे, जाणुन घ्या ७ जबरदस्त फायदे

उपवासाच्या ‘या’ पदार्थाने चेहरा होईल गोरा! केस होतील काळे, जाणुन घ्या ७ जबरदस्त फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रोटीन, कॅल्शियम आणि मिनरल्समुळे साबुदाणे हे आरोग्यासाठी फायदेशिर असल्याचे, तज्ज्ञ सांगतात. साबुदाणे उपवासासाठी वापरले जातात. साबुदाण्याची खिचडी, वडे, पेज असे अनेक पदार्थ उपवासात खाल्ले जातात. म्हणून आपल्याकडे साबुदाण्याला खुप महत्व आहे. उपवासासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेले साबुदाणे सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा फायदेशिर आहेत, हे अनेकांना माहित नसते. दूध, दहीसोबत याचा वापर केल्यास चेहरा आणि केसाची सुंदरता वाढवता येते. सौंदर्य वाढीसाठी साबुदाण्याचा उपयोग कसा, करावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

गोरा रंग
साबुदाणा बारीक करून यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रण लावून चेहरा पंधरा मिनिटाने धुवून घ्या. यामुळे रंग गोरा होतो.

डाग घालवा
साबुदाणा पावडरमधे मध आणि लेमन ज्यूस मिसळा. हे अर्धा तास लावू ठेवा आणि नंतर चेहरा धुवून घ्या. डाग जातात.

चमक वाढते
साबुदाणा पावडरमध्ये दही मिसळा. हे अर्धा तास लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे चमक वाढते.

सुरकुत्यांपासून बचाव
साबुदाणा पावडरमध्ये अंड्याचा पिवळा बलक मिसळून घ्या. हे मिश्रण लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवून घ्या.

काळवंडलेली त्वचा
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा गोरी करण्यासाठी साबुदाणा पावडरमध्ये चिमुटभर हळद आणि थोडे दुध मिसळून हातानेच लावा. चेहरा उजळतो.

केस गळणे
साबुदाणा पावडर ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून केसांना अर्धातास लावून ठेवा. नंतर धुवून घ्या. यामुळे केस गळती थांबते.

निरोगी केस
साबुदाणा पावडर गुलाबपाणी आणि मधासोबत मिसळून केसांना लावा. अर्धा तासानंतर केस धुवून घ्या. यामुळे केसांची चमक वाढते आणि केस निरोगी राहतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु