तुम्हालासुध्दा माहिती नसेल, मुलांना ‘या’ ५ कारणांमुळे येतात पिंपल्स ; जाणून घ्या

तुम्हालासुध्दा माहिती नसेल, मुलांना ‘या’ ५ कारणांमुळे येतात पिंपल्स ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुलांना नेहमीच त्वचेच्या समस्या सतावत असतात. कारण मुले त्यांच्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. या समस्यांपैकी पिंपल्स ही एक सामान्य समस्या आहे. मुलांना पिंपल्सचा त्रास का होतो, याची काही कारणे असून ती आपण जाणून घेणार आहोत.

चेहऱ्याला हात लावणे
चेहऱ्याला सतत हात लावल्याने आणि हातांची स्वच्छता न राखल्याने ही समस्या होऊ शकते. टेबल, चेयर किंवा दरवाज्याला स्पर्श केल्याने हातावर धूळ लागते. याच हातांमुळे स्किन अ‍ॅलर्जी होऊ शकते. यासाठी सॅनिटायजर वापरावे.

व्यायामानंतरचा घाम
व्यायामानंतर येत असलेल्या घामामुळे चेस्ट आणि बॅकवर पिंपल्स येण्याचे चान्सेस वाढतात. हे टाळण्यासाठी व्यायामानंतर काही वेळाने स्नान करा. जीमध्ये जास्त टाइट कपडे घातल्याने सुद्धा पिंपल्सची समस्या वाढू शकते.

शेविंग
शेविंग रेजर अस्वच्छ असल्यास त्वचेवर त्याचा परिणाम होतो. अंघोळीअगोदर हे रबिंग अल्कोहलमध्ये डिप करुन ठेवा आणि हे शॉवर घेतल्यानंतर वापरावे.

कॅप आणि हेल्मेट
हेल्मेट आणि कॅपमध्ये बॅक्टेरिया असल्यामुळे कपाळावर पिंपल्स येऊ शकतात. हे टाळण्यासाठी हेल्मेट घालण्याअगोदर रबिंग अल्कोहलने स्वच्छ करा आणि कॅप प्रत्येक आठवड्यात वॉश करा.

दूध पिणे
दिवसातून २ ग्लासपेक्षा जास्त दूध प्यायल्याने इनडायजेशन होऊन पिंपल्स येऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु