केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पांढरे केस बहुतांश लोकांना आवडत नाहीत. त्यातही कमी वयात केस पांढरे झाल्यास ते लपविण्यासाठी अनेकजण केसांना नियमितपणे कलर करतात. यामुळे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसते. शिवाय वाढलेले वयही लक्षात येत नाही. यासाठी केसांना कलर करणे गरजेचे ठरते. मात्र, अनेक दिवस हा रंग टिकण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. केसांना रंग लावण्याआधी आणि नंतर ही काळजी घेतली पाहिजे.

केसांना रंग लावण्याआधी जीवनशैलीचा विचार करावा. वेळेचा अभाव असेल तर नेहमी केसांच्या नैसर्गिक रंगापेक्षा एक ते तीन शेड फिक्या रंगाचीच निवड करावी. केसांना रंग लावण्याच्या काही आठवडे आधी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट करून घ्यावी. त्यामुळे केसांवर रंग दीर्घकाळ टिकून राहतो. शिवाय, रंगातील रसायनांमुळे केसांचे नुकसानही होणार नाही. रंग लावण्याच्या एक दिवस आधी केस शँपूने धुवावेत. केसांच्या कलपसाठी बरंगडी किंवा ब्राउन असे सहजगत्या न उडणारे रंगच निवडावेत.

केसांना रंग लावल्यानंतर ते शँपूने धुण्याची घाई करू नये. असे केल्यास डाय मॉलेक्युअस केसांमध्ये सेट होण्यास वेळ लागतो. कमीत कमी ४८ तासांनंतरच केस शँपूने धुवावेत. केस धुण्यासाठी अधिक गरम पाणी घेऊ नये. गरम पाण्याने क्युटिकल्सची म्हणजेच केसांच्या बाह्य थराच्या ऑक्सिकरणामुळे हानी होते. त्यामुळे रंग फिका पडू शकतो. रंग लावल्यानंतर आठवड्यातून एकदा केसांची कंडिशनिंग करावी. केसांना हायड्रेशन स्ट्रेंथसाठी ते आवश्यक आहे. केसांच्या रंगात असलेली रसायने केस निर्जीव करतात. यासाठी वातावरणातील बदलांमुळे होणारी केसांची हानी कंडिशनिंगमुळे टाळता येऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु