‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दूध हा नाशवंत पदार्थ आहे त्यामुळे कधी कधी दुध फाटते. वातावरणातील जास्त उष्णतेमुळे अनेकदा दूध नासण्याच्या गोष्टी घडत असतात.फाटलेल्या दुधामधील पाण्याचे भरपूर फायदे आहेत. या पाण्यामुळे शरीराला प्रोटीन मिळतं शिवाय त्वचेच्या आरोग्यासाठी देखील हे पाणी चांगलं मानलं जातं. जाणून घ्या नसलेल्या दुधाचे सौंदर्यवर्धक फायदे

त्वचा मुलायम व तजेलदार बनते
फाटलेल्या दुधातील पाण्यात मायक्रोबियल घटक असतात ज्यामुळे त्वचेचं पीएच योग्य राहतं. फाटलेल्या दुधाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा मुलायम व तजेलदार होते.

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

केसांसाठी कंडिशनर
केसांना शाम्पू लावल्यापूर्वी फाटलेल्या दूधाच्या पाण्याने केस ओले करा. शाम्पूनंतरही कंडिशनरप्रमाणे हे पाणी वापरा. त्यानंतर दहा मिनिटांनी केस पुन्हा गरम पाण्याने स्वच्छ करा.
‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

चेहऱ्यावर चमक येते
नासलेलं दूध बेसन, हळद आणि चंदनामध्ये एकत्र करून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावून १० मिनिटांसाठी तसचं ठेवा. चेहरा चमकदार होण्यास मदत होते.
‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

कोलेस्ट्रॉल कमी करते
फाटलेल्या दूधाचं सेवन करत असाल तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु