मेंदी गडद रंगावी असे वाटते ना ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा आणि फरक पहा

मेंदी गडद रंगावी असे वाटते ना ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा आणि फरक पहा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुलींना मेंदी काढण्याचा मोह नेहमीच होतो. मेंदी जास्त रंगावी असेही महिलांना वाटत असते. त्यासाठी त्या विविध उपाय करत असतात. परंतु, अनेक उपाय करूनही मेंदी रंगत नाही.

महिलांची ही अडचण ओळखून आपण मेंदी रंगवण्याच्या काही खास टिप्स येथे सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्या तर मेंदी अतिशय गडद रंगू शकते.

अशी रंगवा मेंदी

मेंदी लावण्यापूर्वी हात व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. त्यानंतर हाताला निलगिरी अथवा मेंदीचे तेल लावा.

मेंदी रंगवण्यासाठी चून्याचा वापर केला जातो. पाणी न मिसळता मेंदी लावलेल्या हातावर चूना लावा.

मेंदी वाळल्यानंतर हात चादरीने झाका. ऊब मिळाल्यानंतर मेंदीला रंग चढतो.

कोणत्याही कार्यक्रमाच्या दोन दिवसआधी मेंदी काढा. मेंदी शक्यतो रात्री काढा.

मेंदी नैसर्गिकरित्या सुखू द्या. मेंदी सुकवण्याची घाई केल्यास रंग चढत नाही.

कमीत कमी पाच ते सहातास मेंदी हातावर ठेवल्याने रंग खुलतो.

मेंदी सुकल्यानंतर त्यावर साखर आणि लेमन ज्यूस एकत्र करून लावा. म्हणजे आणखी काही काळ मेंदी राहिल.

मेंदी सुकल्यानंतर पाण्याचा वापर न करता काढा. पाण्याने धुवून काढल्यास रंग चढत नाही.

जर मेंदी कमी रंगली असे वाटत असेल, तर त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स अथवा मोहरीचे तेल लावा. यामुळे उष्णता निर्माण होते      आणि मेंदी गडद होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु