सशक्त केस कसे ओळखावेत माहित आहे का ? जाणून घ्या याचे ७ संकेत

सशक्त केस कसे ओळखावेत माहित आहे का ? जाणून घ्या याचे ७ संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिला असो की पुरूष त्यांचे सौंदर्य हे निरोगी केसांमुळेच खुलून दिसते. परंतु, यासाठी केसांची काळजी घेणे खुप महत्वाचे असते. केस निरोगी नसतील तर ते गळणे, टक्कल पडणे, कोंडा होणे, केस निस्तेज दिसणे, अशा समस्या वाढू लागतात. यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे, तसेच रसायनयुक्त प्रॉडक्टचा केसांसाठीचा वापर टाळला पाहिजे. निरोगी केस ओळखण्याचे काही संकेत असून ते आपण जाणून घेणार आहोत.

कमी गळणे
एका दिवसात ५०-६० पेक्षा कमी केस गळतात. शिवाय लवकरच तेवढेच नवीन केस येतात. असे असेल तर तुमचे केस निरोगी आहेत.

चमकदार
चमकदारपणा हा निरोगी केसांचा संकेत आहे. योग्य पोषण मिळाल्याने केस चमकदार होतात.

ओलावा
केसांसाठी ओलावा आवश्यक असतो. हा ओलावा निरोगी केसांचा संकेत आहे.

कोंडा नसणे
कोंडा झाल्यास केस गळतात. कोरडे होतात. डोक्यात कोंडा नसणे, हा केस सशक्त असण्याचा संकेत आहे.

मुलायम केस
मुलायमपणा हा निरोगी केसांचा संकेत आहे. प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळाले तर केस मुलायम होतात.

लवचिक
केसांची लवचिकता हा निरोगीपणा संकेत आहे.

चांगली वाढ
प्रत्येक महिन्यात केसांची वाढ १ ते १.२५ सेमीपर्यंत होणे हे निरोगी केसांचे लक्षण आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु