ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या

ओठांवर जास्त लिप बाम लावता का ? ठरू शकते घातक, ‘हे’ आहेत धोके ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ओठांची काळजी घेण्यासाठी अनेक महिला लिपबामचा वापर करतात. विशेषता थंड वातावरणात ओठ कोरडे झाल्याने याचा जास्त वापर केला जातो. परंतु, ओठांना काहीही लावताना सावधगिरी बाळगली पाहिजे. लिपबाम ओठांचे सौंदर्य वाढवतो, परंतु हे ओठांसाठी हानिकारक ठरु शकते.

हे आहेत धोके

* नियमित लिप बामचा वापर केल्याने ओठ फाटण्याची समस्या होऊ शकते. लिप बामध्ये केमिकल फ्रेग्नेंसचा वापर केला जातो. यामुळे हळुहळू ओठ खराब होतात.

* अनेक मुली सुगंधीत लिपबामचा वापर करतात. परंतु सुगंधीत लिपबाममध्ये अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. यामुळे ओठांना नुकसान होऊ शकते.

* सतत लिपबाम लावल्याने अनेक वेळा ओठांच्या आजुबाजूला बारीक-बारीक हेड्स येतात. लिपबामध्ये मेंथॉल असेल तर ओठ फाटण्याची शक्यता वाढते.

* क्वालिटी न बघता लिपबाम खरेदी केल्यास ओठांचे नुकसान होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु