शुद्ध तुपाचा असा करा वापर, केसांच्या समस्या होतील दूर, ‘हे’ आहेत ६ उपाय

शुद्ध तुपाचा असा करा वापर, केसांच्या समस्या होतील दूर, ‘हे’ आहेत ६ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्राचीन काळापासून तूप खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. तुपाला आयुर्वेदात घृत म्हटले जाते. तूप हे दूधाच्या लोणीपासून तयार होते. आयुर्वेदात तुपाला खूप महत्व आहे. तुपामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने विविध आजारांवर तुप गुणकारी ठरते. विशेष म्हणजे तुप हे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तुपामध्ये थोडेसे बदामाचे तेल टाकले तर त्यामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण चांगले येते. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

तुप केसांना लावण्याची पद्धत
एका भांड्यात ४-५ चमचे तुप गरम करा. ते कोमट झाल्यानंतर ५ ग्राम बदाम पावडर टाका आणि ३ चमचे बदाम तेल टाका. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि धुतलेल्या केसांना लावा. हलक्या हाताने केसांची मसाज करा. ३० मिनिटे लावून ठेवा आणि धुवून घ्या. यामुळे अनेक फायदे होतात.

हे फायदे होतात

* केस पांढरे होणे ही समस्या वाढत चालली आहे. यासाठी केसांना तुप लावणे सुरु करा. टॉवेलने केसांना १५ मिनिट गुंडांळून ठेवा. यानंतर केसांना धुवून घ्या.

* डोक्याच्या त्वचेत एखाद्या प्रकारचे संक्रमण असेल तर डोक्याला तुप लावा. असे केल्याने सोरायसिस सारखा आजार दूर होऊ शकता.

* महिन्यातुन तीन वेळा केसांना तुप लावल्याने केसांची वाढ चांगली होते. केस दाट होतात.

* तुप लावल्याने केस खुप सिल्की होतात. तुपाला कोमट करा. २० मिनिट मसाज करा. आणि डोक्याला थोडे लिंबू पाणी लावा, १० मिनिटांनंतर केस धुवून घ्या. तुप केसांना नॅचरल चमक देते.

* केस नेहमी दोन तोंडी होत असतील तर केस धुण्याअगोदर केसांना कोमट तुप लावावे. १५ मिनिटे लावून ठेवल्यानतंर केसांना कोमट पाण्याने धुवून घ्या.

* केसांत कोंडा असल्यास तुप आणि बदामाचे तेल मिक्स करुन लावा. १५ मिनिटे लावून ठेवल्यानतंर गुलाब जल टाकलेल्या पाण्याने केस धुवून घ्या. नियमित हा उपाय केल्याने कोंडा दूर होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु