सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : सुंदर दिसण्यासाठी महिला घरच्याघरी विविध उपाय करत असतात. घरगुती पदार्थ वापरून हे उपचार केले जात असले तरी कधी-कधी ते नुकसानकारक ठरू शकते. काही पदार्थ त्वचेवर लावल्याने त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे सौंदर्य वाढविण्यासाठी काहीही उपाय करताना तो तज्ज्ञांनी सांगितला असेल तर करा.अन्यथा तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर कोणते पदार्थ लावल्यास कोणते नुकसान होते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
व्हिनेगरमध्ये जास्त अ‍ॅसिड असते. हे पाण्यात न मिसळता चेहऱ्यावर लावले तर त्वचेच्या समस्या होतात.खाज किंवा रॅशेश येऊ शकतात. तसेच बियरच्या अ‍ॅसिडिक नेचरमुळे स्किन कोरडी होते. यामुळे त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते. बेकिंग सोडामध्ये अल्केलाइड्समुळे स्किनचे झक लेव्हल बॅलेन्स राहत नाही.पाणी न मिसळता हे लावल्याने पिंपल्स वाढतात.
पुदीनामध्ये मेंथॉल असते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ आणि रेडनेस होऊ शकते. तसेच टूथपेस्ट स्किनवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा वाढतो. यामुळे रिंकल्स होऊ शकतात.बॉडी लोशन हे लोशन चेहऱ्याच्या स्किन सेल्सला नुकसान पोहोचवते. यामुळे त्वचेचा ग्लो कमी होतो. व्हॅसलिन हे चहऱ्यावर लावल्याने धुळीचे कण त्वचेवर चिटकतात. यामुळे स्किन पोर्स बंद झाल्याने स्किन खराब होते. त्यामुळे व्हिनेगर, बेकिंग सोडा, बियर, पुदीना, टूथपेस्ट, बॉडीलोशन आणि व्हॅसलिन सारखे पदार्थ चेहऱ्यावर लावू नका. यामुळे चेहरा खराब होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु