सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ उपाय नक्कीच करा

सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ उपाय नक्कीच करा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या धकाधकाच्या आयुष्यात आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चेहऱ्यासह पूर्ण त्वचा ही शुष्क होते. त्यामुळे आपण फ्रेश तजेलदार दिसत नाही. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणारे कॉसमॅटीक प्रोडक्टसचा वापर करतो. त्यामुळे त्वचा कधी सुधारण्याएवजी अधिक खराबही होऊ शकते. मात्र आपण आपल्या पुर्वजांनी आपल्या सौंदर्यासाठी सांगितलेल्या उपायांकडे दुर्लक्ष करतो. अशेच काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही तुमच्या तव्चेची पोत सुधारू शकता.

त्वचेची पोत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

१) चना डाळ ही आपल्या त्वचेसाठी अधिक उपयुक्त असते. दररोज साबण लावून आपण आंघोळ करतो. पण त्याजागेवर हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावले तर आपल्या त्वचेची पोत सुधारू शकते.

२) कोळ आणि गोडे जिरे हे आपल्या घरात सहज उपलब्ध असते. हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी उत्तम आहेत. कोळ आणि गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करून त्यात थोडी साय टाकून मिश्रण तयार करून घ्यावे. हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावावे, आणि २० मिनिटांनी ते धुन टाकावे.

३) हळद ही तर आपल्या त्वचेला उजळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे, हे सर्वांनाच माहित आहे. दूध पावडर, मध, हळद, आणि अर्धे लिंबू एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे, चेहऱ्यासह ते आपण आपल्या हात, मानेवरही लावू शकतो.

४) ओटस हे डाएटसाठी जसे महत्त्वाचे असतात तसं त्वचेसाठीही फायदेशीर असतात. ओटचे पीठ, चंदनाचे चूर्ण एकत्र करून चेहऱ्यावर चोळावे. त्यानंतर कच्च्या बटाट्याचे चकत्या चेहऱ्यावर ठेवाव्यात. त्याने चेहरा मुलायम आणि स्निग्ध राहतो.

५) ओली हळद आणि मोहरी जसे खाण्यात येतात, तसंच त्यांचा दररोज एकत्रित वापर केल्याने Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावले तर ते कमी कालांतरात कमी होतात.

६) संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं म्हटलं जाते. तस हे अंड चेहऱ्यासाठीही उपयोगी असते. १ लिंबू आणि १ अंड एकत्रित करून चेहऱ्यावर लावले तरी चेहरा सुधारतो.

७) ग्लिसरीन हे मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. तेही आपल्या त्वचेसाठी अधिक महत्त्वाचे काम करते. १ चमचा ग्लिसरीन घेऊन त्यात आवळा तेलाचे ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावले तर त्वचा मुलायम आणि उजळतो.

८) ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांची त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दररोज चेहऱ्यावर दह्याने मसाज करावा, त्याने चेहरा प्रसन्न दिसतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु