‘माईण्डफुलनेस मेडिटेशन’ करून दूर ठेवा ‘डिमेन्शिया’, ‘अल्झायमर’ सारखे आजार

‘माईण्डफुलनेस मेडिटेशन’ करून दूर ठेवा ‘डिमेन्शिया’, ‘अल्झायमर’ सारखे आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या मेंदूत, मनात सतत हजारो विचार घोळत असतात. काही वेळा यात गडबड होते. काही गोष्टी प्रयत्न करूनही आठवत नाहीत. त्यातून नंतर डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा त्रास होतो. पुढे अल्झायमर सुद्धा होऊ शकतो. माइण्डफुलनेस मेडिटेशन केल्यास या समस्येतून सुटका होऊ शकते. तसेच ध्यान धारणा, श्वसनाचे प्रकार हे मन शांत करण्यासाठी आवश्यक असून ते नियमित करणे गरजेचे आहे.

माईण्डफुलनेस मेडिटेशनचे फायदे

२५ मिनिटे माईण्डफुलनेस मेडिटेशन केल्यास आपल्या मेंदूचं विचारचक्र बदलते. थिकिंग पॅटर्न बदलतात. इमोशलन रिस्पॉन्स आपण जे देतो ते बदलून योग्य रिस्पॉन्स देणे सुरु होते. त्यातून डिमेन्शियासारखे आजारही टाळले जातात. मेंदूला कायम चित्त एकवटण्याची सवय लागते.

ध्यान धारणेचे फायदे

१) मेंदूला विश्रांती आणि तजेला मिळतो.
२) मेंदूची स्मरणशक्ती वाढते.
३) चित्त एकाग्र झाल्याने कामे पटापट आणि उत्तम होतात. आनंद मिळतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु