तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – ज्यांच्याकडे व्यायाम करण्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध असेल त्यांनी आर्टिस्टिक योगाला पसंती देणे फायदेशीर ठरू शकते. शरीराचे आरोग्य राखण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. आर्टिस्टिक योगाला अलीकडे चांगली पसंती मिळत आहे. या योगात विविध मुद्रांसोबत अनेक स्पोट्र्स कसरतींचा समावेश आहे.

यामध्ये खेळता खेळता शारीरिक स्थिती चांगली ठेवता येते. या योगा प्रकारात वजन कमी करणे आणि शरीर सूडौल बनवणे यास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच तणाव कमी करणे, पाठदुखीपासून मुक्ती या योगातून शक्य आहे. हा योगा स्नायू, ग्रंथी आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने व्यक्तीला जास्त ताजेतवाणे वाटते. हा प्राचीन योगाचा आधुनिक प्रकार असून शरीर सूडौल ठेवण्यावर भर दिला जातो. सोबत काही खेळातील प्रकार सुद्धा यात वापरले जातात.

यात संगीताला देखील महत्त्व आहे. या योगाचा लवकर परिणाम दिसत असल्याने तो लोकप्रिय होत आहे. प्रत्येक सुखसुविधेसोबत आता फिटनेससाठी व्यायाम एक स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. जो व्यक्ती जेवढा फिट तेवढा तो हिट ठरत आहे. परिणामी फिटनेस चांगला राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. आज आर्टिस्टिक योगा युवक आणि प्रौढ दोघांसाठी चांगला व्यायाम ठरतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु