केस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान

केस धुतल्‍यानंतर चुकूनही करु नका ‘या’ ५ गोष्‍टी, होईल मोठे नुकसान
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – महिला असो की पुरूष, सर्वचजण केसांची खुप काळजी घेत असतात. यासाठी विविध प्रकारचे तेल, शॅम्पूचा वापर केला जातो. काहीजण केसांच्या समस्यांसाठी गोळ्या औषधेही घेतात. परंतु, अनेकदा आपल्याच हातून झालेल्या काही चुकांमुळे केसांचे नुकसान होत असते. या चुकांचा केसांवर वाईट परिणाम होतो. आंघोळ केल्यानंतर केस ओले असताना काही गोष्‍टी टाळाव्यात. अन्यथा हेअर फॉल, केस पातळ होणे अशा अनेक समस्‍या होऊ शकतात. यासाठी कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा

ओल्‍या केसांना तेल लावणे
ओल्‍या केसांना तेल लावण्‍याने त्‍यावर धुळ चिटकते. हेअर फॉल आणि डँड्रफ होऊ शकते. आंघोळ झाल्‍यानंतर ३० मिनिटांनी  केसांना तेल लावावे. अथवा रात्री झोपण्‍यापूर्वी तेल लावावे.

केसांना बांधणे
केस धुतल्‍यानंतर लगेच त्‍यांना बांधल्‍याने ते दीर्घकाळापर्यंत ओले राहतात. यामुळे इन्‍फेक्‍शन, डँड्रफ आणि स्‍कल्‍पचा धोका वाढतो.
बोट फिरवणे
ओल्‍या केसांचा गुंता सोडवण्‍यासाठी बोटांचा वापर करु नये. यामुळे केस बोटांमध्‍ये अडकून तुटू लागतात.

कंगवा फिरवणे
आंघोळ केल्‍यानंतर केस काही वेळ ओले असतात. तशा अवस्‍थेत केसांवरुन कंगवा फिरवल्‍यास केसांची मुळे कमकुवत होतात. ते तुटू लागतात.

मशीनचा वापर
केस धुतल्‍यानंतर मशीनचा गरजेपेक्षा जास्‍त वापर केल्‍याने केसांची मुळे कमकुवत होतात. हेअर फॉलचा धोका असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु