जागतिक सायकल दिन : केंद्रीय आरोग्यमंत्री सायकलने गेले कार्यालयात

जागतिक सायकल दिन : केंद्रीय आरोग्यमंत्री सायकलने गेले कार्यालयात

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – देशाचे नवे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. जागतिक दिनाचे औचित्यसाधून त्यांनी सायकलवरून कार्यालय गाठले आणि पदभार स्वीकारला. आरोग्यासाठी सायकल चालवणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या कृतीद्वारे दाखवून दिले.

यावेळी डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्राला पुढे नेण्यात येईल. देशाची सेवा करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातील. देशातील गरीब आणि गरजूंना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत फायदा झाला आहे. या योजनेचा देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांना फायदा व्हावा म्हणून या योजनेअंतर्गत अधिक रूग्णालयांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात येणार आहे. एका मोठ्या मोहिमेद्वारे देशाला टीबीमुक्त करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अनेक रोगांना प्रतिबंध म्हणून लसीकरणासाठी देखील पुढाकार पुढील काळात घेण्यात येईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु