गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

आरोग्यानामा ऑनलाइन – गरोदरपणात महिला जे काही करत असतात त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होत असतो. यासाठी अशा महिलांनी खुप विचारपूर्वक सर्व क्रिया केल्या पाहिजेत. योग्य आहार घेणे, आरोग्‍याची काळजी घेणे, वास्‍तू शास्‍त्राचे नियम पाळणे, याबाबत दक्ष असले पाहिजे. या नियमांचे पालन केल्‍यास निरोगी, सशक्त आणि सुंदर बाळ जन्माला येऊ शकते.

अशी घ्या काळजी

१ वायव्य दिशा
गर्भवती महिलेने कधीही उत्तर-पश्चिम दिशेला झोपू नये. झोपताना डोके दक्षिणेकडे राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे.

२ जिन्याखाली असलेल्या कोणत्याही खोलीत गर्भवती महिलेने वास्तव्य करू नये. अशा खोलीत नकारात्मक उर्जा असू शकते.

३ गडद रंगाचे कपडे
गरोदर महिलेने लाल, काळ्या रंगाचे गडद कपडे कधीही परिधान करू नयेत. सलग ९ महिने फिकट गुलाबी, फिकट पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.

४ गॅजेट्स टाळा
गरोदर महिलेने या कालावधीत कॉम्प्यूटर, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून दूर रहावे.

५ फर्निचर
गर्भवती महिलेच्या घराचा मधला भाग रिकामा असावा. जड आणि भरपूर फर्निचरमुळे तेथे नकारात्मक उर्जा तयार होऊ शकते.

६ नैसर्गिक प्रकाश
ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश येतो, अशा खोलीत गरोदर महिलेने वास्तव्य करावे. अंधार असलेल्या, कमी प्रकाशात राहू नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु