पल्स पोलिओ अभियानात महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग

पल्स पोलिओ अभियानात महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग

यवतमाळ : आरोग्यनामा ऑनलाईन – राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने पल्स पोलिओ अभियान नुकतेच राबविण्यात आले. लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील रासेयोच्या १०० विद्यार्थिनींनी यवतमाळ शहरातील विविध दहा पोलिओ आपला सहभाग नोंदविला.

दिवसभरात दोन विविध पाळ्यामध्ये सर्व केंद्रावर आपली सेवा दिली. यामध्ये परिसरातील नागरिकांकडे जाऊन पाच वर्ष आतील बालकांची चौकशी करणे व त्यांना पोलिओची लस दिल्याची खात्री करण्यात आली. हा कार्यक्रम न. प. यवतमाळ व स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांच्या सौजन्याने घेण्यात आला. दिवसभरात शहरातील दहा केंद्र मिळून एक हजार ५५० बालकांना पोलिओची लस देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थिनींना न. प. यवतमाळ तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे, रासेयो अधिकारी प्रा. डॉ. कविता तातेड, प्रा. डॉ. संतोषकुमार गाजले, प्रा. डॉ. सरिता देशमुख, प्रा. ज्वाला नागले, प्रा. सौरभ वगारे यांनी सहकार्य केले. पल्स पोलिओचे राष्ट्रीय कार्य पार पाडल्याबद्दल विद्यार्थिनींचे कौतुक केल्या जात आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु