‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या

‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या पूर्वीपेक्षा महिलांवर कामाची व अन्य जबाबदरी वाढली आहे. एकाच वेळी त्यांना विविध पातळीवर व भूमिकांमध्ये काम करावे लागते. कामाचा हा बोजा वाहण्याचे आव्हान आणि कर्तव्य आपोआपच त्यांच्या खांद्यावर लादले गेले आहे. चूल आणि मूल ही चौकट तोडून बाहेर पडलेल्या महिलांची जबाबदारी पूर्वीपेक्षा कित्येकपटीने वाढली आहे. यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला असून या ताणामुळे त्यांना अकाली मृत्यूचा धोका जास्त असल्याचे दिसते. ओटावा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन करून निरीक्षण नोंदवले आहे.

ही आहेत कारणे

१. प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट, व्यवस्थितच झाली पाहिजे, कोणतीच कमतरता त्यात राहायला नको, असा सततचा दबाव वाढला.

२. जबबादारीचे प्रमाण वाढले.

३. अतिरिक्त ताणाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस महिला दबल्या जात आहेत.

४. ताणाचा त्यांच्या शरीर, मनावर परिणाम होतो आहे.

५. अति तणावामुळे आयुष्यही कमी होत असून अकाली मृत्यू येत आहे.

या उपायांची गरज

* आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी महिलांवरील ताण कमी झाला पाहिजे.
* ताण कमी करण्यासाठी महिलांनीही स्वत:हून प्रयत्न केले पाहिजेत.
* प्रत्येक आघाडीवर लढताना काही काळ विश्रांतीही घेतली पाहिजे.
* आरोग्याकडे लक्ष दिले. पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु