अचानक ‘लठ्ठपणा’ का येतो ? जाणून घ्या कारणे

अचानक ‘लठ्ठपणा’ का येतो ? जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणामुळे शरीराला अनेक आजार जडतात. म्हणूनच लठ्ठपणा आला की अन्य आजारही आपोआपच येतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणासोबतच येतात. यासाठी वजन हे उंचीशी साजेसेच हवे. सुमारे ५ फूट उंचीसाठी ६० किलो वजन अपेक्षित असते. लठ्ठपणा म्हणजे उंचीच्या तुलनेत वजन अधिक असणे होय. लठ्ठपणामुळे संपूर्ण शरीर थुलथुलीत होते. मांसपेशी देखील ढिल्या होतात. पोट पुढे येते. हात आणि मांड्यांच्या ठिकाणीही चरबी साठते. लठ्ठपणा येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही महत्वाची कारणे आपण जाणू घेणार आहोत.

चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या सवयी, दररोज मांस आणि मदिरासेवन, योगा किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ नसणे, शरीरात निर्माण झालेली ऊर्जा वापरली गेली नाही तर ती चरबीच्या रूपात साठून राहते. परिणामी वजन वाढते. जेवण, विश्रांती आणि झोप यांच्या वेळा नियमित नसल्यानेही आरोग्य बिघडते आणि लठ्ठपणा वाढतो. सात्त्विक भोजनाऐवजी जंक फूड घेणे, आरोग्यदायी पदार्थ न खाणे आदी कारणांमुळे लठ्ठपणा वाढतो.

लठ्ठपणा टाळण्यासाठी भुकेपेक्षा कमी खावे. अधिक फळे खावीत. हिरव्या पालेभाज्या खाव्यात. तसेच भोजनानंतर एका तासाने पाणी प्यावे. गाजराचा रस रोज प्यावा. मोड आलेली कडधान्ये खावीत. कमी कॅलरीचे भोजन घ्यावे. तळलेले आणि तिखट पदार्थ खावू नयेत. जेवणात मीठाचे प्रमाण कमी असावे. तसेच टोमॅटो नियमित खाल्ल्यानेही आरोग्य चांगले राहते. लठ्ठपणा टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास केला पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु