मधुमेह आणि किडनीच्या आजारात ‘तुळस’ लाभदायक, ‘हे’ आहेत 12 फायदे

मधुमेह आणि किडनीच्या आजारात ‘तुळस’ लाभदायक, ‘हे’ आहेत 12 फायदे

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – तुळशीत औषधी गुणधर्म मोठ्याप्रमाणात असल्याने अनेक आजारांवर ती गुणकारी आहे. अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सीडेंट, कॅल्शियमसह यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ताप, डेंगू, आदीसह मधुमेह आणि किडनीच्या आजारात तुळस रामबाण इलाज आहे.

हे आहेत फायदे

१. तुळस चहात टाकून सेवन केल्यास मधुमेहाच्या रूग्णांना फायदा होऊ शकतो. कच्ची पाने खाणे, पावडर, पेस्ट तसेच हर्बल सप्लीमेंटच्या स्वरूपात तुळशीचे सेवन करता येते.

२. किडनी स्टोनच्या समस्येवर तुळस गुणकारी आहे.

३. तुळस डिटॉक्सीफाइंग, क्लिंजिंग आणि प्यूरिफाइंग घटकाच्या स्वरूपात काम करत असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. यामुळे आरोग्य चांगले राहते.

४. ताप, डोकेदुखी, घशाचा त्रास, सर्दी, खोकला, फ्ल्यू आणि छातीतील कफावर तुळस लाभदायक आहे.

५. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा सारख्या आजारांवर तुळस सेवन करून उपचार करता येऊ शकतो.

६. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी तुळस उपयोगी आहे. तसेच अपचनाची समस्या सुद्धा यामुळे दूर होऊ शकते.

७. तुळशीत फायटोन्यूटिड्ढयंट्स, अ‍ॅसेंशियल ऑइल्स, व्हिटॅमिन अ आणि सी भरपूर प्रमाणात असते.

८. दाताच्या विविध प्रकारच्या दुखण्यापासून तुळशीमुळे आराम मिळू शकतो.

९. हेपॅटायटिस, मलेरिया, टीबी, डेंग्यू आणि स्वाईन फ्लू सारख्या आजारात उपचारासाठी उपयोगी आहे.

१०. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

११. मानसिक ताण नियंत्रणात राहतो.

१२. रोग प्रतिकारशक्ती वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु