ठाण्यात एफडीएने जप्त केला हजारोंचा औषध साठा

ठाण्यात एफडीएने जप्त केला हजारोंचा औषध साठा

आरोग्यनामा ऑनलाईन – औषध आणि प्रसाधन कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला खरेदी विक्री आणि साठा करण्याचा परवाना मंजूर नसताना औषध साठा केल्याने भाईंदरमध्ये तब्बल ७९ हजार रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला. ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाने पोलिसांसह ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.

भाईंदर (पूर्व) येथील पॅराडाईजमधील एका घरात औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार औषध निरीक्षक प्र. दि. हारक आणि सपना घुणकीकर यांनी पोलिसांसह या घरावर छापा असता घरात मोठ्या प्रमाणात विविध औषधांचा साठा सापडला. ही औषधे प्रामुख्याने प्रवर्गातील आणि स्टेरॉईडस असल्याचे आढळून आले. या जागेस औषध आणि आणि प्रसाधन कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला खरेदी विक्री आणि साठा करण्याचा परवाना कन्हैया वकील कनोजिया यांना मंजूर नाही.

कनोजिया यांनी विनापरवाना जागेत औषध साठा विक्रीसाठी केल्याने तसेच सदर औषधे कुठून खरेदी केली किंवा विक्री केली याबाबत कोणतीही माहिती न दिल्याने त्यांच्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी कनोजियाला अटक करण्यात आली असून ७९,९६९ रुपये किमतीचा औषध साठा जप्त केला आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु