शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या पुरुष आणि महिलांमध्ये इनफर्टिलिटीची समस्या वाढत आहे. योगासनांद्वारे ही समस्या नियंत्रणात आणता येणे शक्य आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, ज्या महिला योगासन करतात त्याची प्रेग्नंट होण्याची शक्यता योगासन न करणाऱ्या महिलेच्या तुलनेत तीनपटींनी वाढते. अशी काही योगासने आहेत, जी ब्लड सक्र्युुलेशन सुधारतात. यामुळे स्ट्रेस दूर होतो. तसेच प्रोस्टेट ग्लँड आणि ओव्हरीसंबंधित समस्या दूर होतात. यामुळे पुरुष आणि महिला दोन्हींची फर्टिलिटी वाढू शकते.

फर्टिलिटी वाढविणारे पश्चिमोत्तासन करण्यासाठी पाय पसरवून बसा. श्वास घेत शरीर मागे घ्या. श्वास सोडत समोर वाका. हातांनी पायाचे अंगठे पकडा. डोके गुडघ्याला लावा. थोडा वेळ थांबा, पुन्हा पहिल्या स्थितीत या. दुसरे आसन आहे पादहस्तासन. हे आसन करण्यासाठी पाय चिकटवून सरळ उभे राहा. गुडघे सरळ ठेवा आणि श्वास सोडत समोर वाका. आता हातापायांच्या पंजांखाली ठेवा. काही सेकंद याच पोझिशनमध्ये राहा. तसेच पद्मासन करण्यासाठी सरळ बसावे. डावा पाय उजव्या मांडीवर आणि उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा. आता हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करून ध्यान करा. आणखी एक महत्वाचे आसन म्हणजे सर्वांगासन होय. हे आसन करण्यासाठी पाय सरळ ठेवून पाठीवर झोपा. पाय न वाकवता वर उचला. कोपराच्या साहाय्याने पाठ वर करून ९० डिग्रीचा अँगल बनवा. थोडा वेळ थांबा, नंतर हळूहळू पहिल्याच पोझिशनमध्ये या.

फर्टिलिटीसाठी लाभदायक असलेले हलासन करण्यासाठी पाय पसरवून बसावे. श्वास घेऊन शरीर मागे वाकवा. श्वास सोडत पुढे या. हातांनी पायाचे अंगठे पकडा. डोके गुडघ्यांवर लावा. थोडा वेळ थांबा आणि पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.

तसेच भद्रासन करण्यासाठी सरळ बसून पाय वाकवा. दोन्ही पायांच्या पंजाचा एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही हातांनी पाय पकडा. डोळे बंद करून डोके पायांना लावण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ श्वास रोखून असेच राहा. वज्रासन करण्यासाठी गुडघे वाकवून सरळ बसा. या वेळी हिप्स टाचांवर ठेवा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घेऊन सोडा. असे ८-१० मिनिटे करावे. कपालभाती प्राणायाम करण्यासाठी पद्मासनाच्या मुद्रेत बसावे. दीर्घ श्वास घ्याावा आणि बाहेर सोडावा. या काळात पोट मध्ये घ्यावे. ही प्रक्रिया पुन्हा करावी. यामुळे फर्टिलिटी चांगल्या प्रकारे होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु