‘या’ आजारांचा लैंगिक जीवनावर होतो परिणाम

‘या’ आजारांचा लैंगिक जीवनावर होतो परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन – अनेकजण असे असतात ज्यांना त्यांच्या लैंगिक जीवनापासून पूर्ण आनंद मिळत नाही. या समस्येची विविध कारणे आहेत. शारीरिक संबंधाबाबतच्या या समस्येकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा लैंगिक जीवन निरस होते. लैंगिक समस्या असण्याला वेगवेगळे आजारही कारणीभूत ठरतात. या आजारांचा लैंगिक जीवनावर फार वाईट परिणाम होऊ शकतो. डायबिटीस, डिप्रेशन, लठ्ठपणा, कंबरदुखी, एनीमिया, वॅस्कुलर डिजीज, मोनोपॉज याचा लैंगिक जीवनावर परिणाम होत असतो. परंतु, यावर वेळीच उपचार केले तर तुम्ही आनंद उपभोगू शकता.

सध्याच्य जीवनशैलीमुळे अनेकांना कंबरदुखी, पाठदुखी सारखे आजार सतावत असतात. यामुळे शरीरात होणाऱ्या वेदनांमुळे कामेच्छा कमी होते. कंबर आणि पाठदुखीच्या वेदनांमुळे शारीरिक संबंधात आनंद उपभोगता येत नाही. एनीमियासारख्याच कंबरदुखी, बॅक पेन सुद्धा प्रत्यक्ष रूपाने लैंगिक जीवनाला प्रभावित करत नाही. एनीमियाने लैंगिक जीवन प्रत्यक्षपणे प्रभावित होत नसले, तरी एनीमियामुळे शरीरात कमजोरी येते आणि यामुळे कामेच्छा कमी होते. महिला, पुरूषांमध्ये एनीमियामुळे कामेच्छा कमी होते. एनीमियामुळे पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ लागते. वॅस्कुलर डिजीज असेल तर जननांगांमध्ये ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे होऊ शकत नाही. तसेच ब्लड प्रेशरसारख्या समस्या होतात. या समस्येमुळे ब्लड फ्लो योग्य राहत नसल्याने उत्तेजना कमी होते.

महिलांमध्ये मेनोपॉजमुळे कामेच्छा कमी होऊ लागते. मोनोपॉजदरम्यान महिलांच्या शरीरात बरेच हार्मोन्स बदल होऊन क्षमता घटू लागते. त्यामुळे कामेच्छा कमी होते. डायबिटीसमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळेच शारीरिक संबंधात अडचणी येतात. पुरूषांमध्ये डायबिटीसमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन ही समस्या होते. यामुळे कामेच्छा कमी होते. तसेच शारीरिक संबंध ही मोकळेपणाने करण्याची प्रक्रिया असल्याने डिप्रेशनसारख्या आजारामुळे लैंगिक जीवन बिघडते. इच्छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवले तर दोघांनाही आनंद मिळत नाही. तसेच सेक्शुअल डिस्फंक्शन ही समस्या होते. लठ्ठपणामुळे विविध आजार होतात. तसेच लठ्ठपणा लैंगिक जीवनाला मोठ्याप्रमाणात प्रभावित करतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु