‘हे’ आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

‘हे’ आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – लिव्‍हर हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. कारण लिव्हर शरीरातील महत्वाचे कार्य करत असते. रक्‍त शुद्ध करणे, हार्मोन्‍सची निर्मिती, अन्‍न पचवणे, उर्जानिर्मीती अशी अनेक कामे लिव्‍हर करते. लिव्‍हरच्‍या आरोग्यावरच शरीराचे आरोग्‍य अवलंबून असते. लिव्‍हरचे आरोग्य बिघडल्यास अनेक समस्या निर्माण होतात. याची लक्षणे आपण जाणून घेवूयात.

हे आहेत संकेत

ब्‍लड क्‍लॉटिंग
लिव्‍हर रक्‍त योग्‍यरित्‍या स्‍वच्‍छ करत नसेल तर शरीरावर ब्‍लड क्‍लॉटिंगचे डाग दिसू लागतात. ही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्‍टरांकडे जा.

पोटाच्‍या वरच्‍या भागात वेदना
पोटाच्‍या वरच्‍या भागात सूज किंवा वेदना होत असतील तर लिव्‍हरची समस्या असू शकते. नेहमीच अशा वेदना होत असतील तर डॉक्‍टरांकडे जा.

सांधेदुखी
सांधेदुखी, सर्दीखोकला, मळमळ होणे, कमी भूक लागणे हे लिव्‍हर कँसरचे संकेत आहेत. असे संकेत जाणवल्यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा.

पिवळसर डोळे आणि त्‍वचा
शरीरातील रक्‍ताच्‍या पेशी तूटू लागतात तेव्‍हा बिलिरुबिन हे घटक तयार होते. लिव्‍हर चांगले असेल तर बिलिरुबिनला सहजतेने शरीराबाहेर टाकते. मात्र कमकूवत लिव्‍हर असे करु शकत नाही. यामुळे त्‍वचा आणि डोळे पिवळसर होऊ लागतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु