ऑफिसमधील वातावरणाचा होतो आरोग्यावर परिणाम, ‘ही’ आहेत 8 कारणे

ऑफिसमधील वातावरणाचा होतो आरोग्यावर परिणाम, ‘ही’ आहेत 8 कारणे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांचे नोकरीला लागल्यानंतर वजन वाढते. अशा लोकांना अनेकजण म्हणतात की, नोकरी खुपच मानवली आहे. परंतु, हे मानवणे सुद्धा आरोग्यासाठी त्रासदायक आहे. वजन वाढणे, अ‍ॅसिडीटी असे त्रास यामुळे होऊ शकतात.

ही आहेत कारणे

१. ज्यांच्या कामाच्या वेळा, शिफ्ट, जेवणाच्या वेळा सतत बदलतात त्यांचेही वजन लवकर वाढते.

२. तणाव आला तरी अनेकजण काम करताना वेफर्स, बिस्टिट, चिप्स, खारे शेंगदाणे, शेव खातात. यामुळेही वजन वाढते. यास स्ट्रेस इटिंग म्हणतात.

३. काम करताना जेवल्याने आपण किती खातोय हे समजत नाही. तसेच बसून राहिल्यानेही वजन वाढते.

४. अनेक ऑफिसमध्ये सतत काहीतरी खाणे सुरूच असते. सतत स्नॅक, सॅडवीच, पिझ्झा, थंडपेये, चहाकॉफी मागवली जाते. यामुळे वजन वाढते.

५. घरचा डबा दुपारी खाल्ल्यानंतर अनेकजण संध्याकाळी भेळ, वडे, असे खातात.

६. ऑफिसमध्ये अंधुक उजेड असेल. डीमलाइट असेल, सूर्यप्रकाशच येत नसेल तर या वातावरणात सतत काही ना काही खावंसे, प्यावेसे वाटते. ऑफिसमध्ये तसे वातावरण असेल तर या खाण्याकडे लक्ष ठेवा. प्रकाशात चक्कर मारुन या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु