मित्रमंडळींपासून दूर राहिल्यास वार्धक्यात विस्मृतीचा धोका ! ‘हे’ आहेत 4 दुष्परिणाम

मित्रमंडळींपासून दूर राहिल्यास वार्धक्यात विस्मृतीचा धोका ! ‘हे’ आहेत 4 दुष्परिणाम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तुम्हाला जास्तीत जास्त मित्र असतील तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. समाज आणि मित्रमंडळींपासून दूर राहिल्यास आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरू शकते. कामामुळे रोजच्यारोज इतरांशी संपर्क ठेवणे शक्य होत नसले तरी वेळ काढून मित्रपरिवाराच्या संपर्कात जरूर राहिले पाहिजे. अन्यथा काही दुष्परिणाम तुम्हाला उतारवयात सतावू शकतात, असे प्लॉस वन या प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

मित्रांपासून दूर राहण्याचे दुष्परिणाम

१. ज्यांना कमी मित्र आहेत, जे त्यांच्यात कमी मिसळतात, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेने लवकर जडू शकतो.

२. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते, मेंदूच्या संदर्भातील विकारांनी ते त्रस्त होतात.

३. जसजसे वय वाढत जाते, तसतसे हा त्रास वाढत जाऊ शकतो.

४. वयाच्या ऐंशीनंतर स्मृती फारच कमजोर होतात, मित्रमंडळींच्या सोबतीत राहिल्यास आनंदी राहू शकता. वाढत्या वयाचा शरीरावर कमीत कमी परिणाम होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु