कँसरच्या रूग्णांसाठी मोठी बातमी, 5 वर्ष अगोदरच होऊ शकते आजाराचे निदान

कँसरच्या रूग्णांसाठी मोठी बातमी, 5 वर्ष अगोदरच होऊ शकते आजाराचे निदान

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कँसरच्या रूग्णांसाठी ही खरोखरच मोठी बातमी आहे. यासंबंधी संशोधन करणाऱ्या संशोधकांनी म्हटले आहे की, जर निधीची समस्या आली नाही तर येत्या काळात लवकरच एक अशा रक्तचाचणीचा शोध लावला जाईल ज्याद्वारे शरीराच्या तपासणीनंतर पाच वर्षे अगोदरच कँसरचे निदान होऊ शकते. तसेच शरीरात कँसरची लक्षणे असल्याचेही समजू शकते. लाइव्ह हिंदुस्तानने प्रसिद्ध केलेल्या या बातमीत म्हटले आहे की, संशोधकांनी आतापर्यंतच्या संशोधातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांवरून हे मत व्यक्त केले आहे.

* १८० लोकांच्या रक्ताचे नमुणे
हे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी १८० लोकांच्या रक्ताचे नमुणे घेतले होते. यातील ९० जणांवर कँसरचे उपचार सुरू होते तर ९० जण पूर्णपणे निरोगी होते. याशिवाय संशोधकांनी पुन्हा ८०० रूग्णांच्या रक्तनमुण्यांवर विविध शक्यतांवर आधारित तपासण्या केल्या. प्रथम केलेल्या प्रयोगाची सत्यता अधिक स्पष्ट करण्यासाठी या तपासण्या करण्यात आल्या.

* या देशांना फायदा
यासंदर्भात नॉटींगहम विश्वविद्यालयाच्या पीएचडीच्या विद्याथ्र्याने माहिती देताना सांगितले की, जे देश कमी आणि मध्यम उत्त्पन्न असलेले आहेत त्यांच्यासाठी रक्त तपासणीद्वारे स्तनाच्या कँसरचे पहिल्याच स्टेजमध्ये निदान होऊ शकल्याने त्यांना दिलासा मिळू शकतो.

* मृत्यूचे प्रमाण जास्त
दरवषी सुमारे २१ लाख महिलांना स्तनाचा कँसर झाल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये स्तनाच्या कँसरमुळे जगभरात सहा लाख २७ हजार महिलांचा यामुळे मृत्यु झाला आहे. इतर अन्य प्रकारच्या कँसरमुळे सुमारे १५ टक्के महिलांचा मृत्यू झाला आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु