नागपूरचे डायलिसिस केंद्र मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होणार

नागपूरचे डायलिसिस केंद्र मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होणार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी विकाराने ग्रस्त गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी नागपूरच्या सुपर स्पेशालिटीत येतात. गंभीर रुग्णांना डायलिसिसशिवाय गत्यंतर नसते. खासगीत हे डायलिसिस महागडे आहे. सुपरमध्ये हे केंद्र मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित झाल्यास रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

सुपरमध्ये किडनीच्या रुग्णांसाठी बाह्य रुग्ण विभाग आहे. डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी वाढत आहे. दिवसाला मोजके डायलिसिस होते. निदान झालेल्या मोजक्याच रुग्णांना डायलिसिसची गरज भासते. मात्र, खासगीत ही प्रक्रिया खर्चिक आहे. अशा बिकट परिस्थितीत सुपरच्या किडनी विभागावर प्रचंड भार येतो. तंत्रज्ञ आणि निवासी डॉक्‍टर दिल्यास व उपलब्ध प्रक्रि येची व्याप्ती वाढविल्यास तुलनेने अधिक रुग्णांची सोय येथे होऊ शकेल. सोबतच या विभागाच्या कामालाही गती मिळेल.

रुग्णांना २४ तास या डायलिसिस सेवेचा लाभ घेता येईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुपरमध्ये अधिकचे तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. अडीच वर्षे लोटूनही त्याची पुर्तता अद्याप झाली नाही. हे तंत्रज्ञ उपलब्ध झाल्यास येथील डायलिसिस सेंटरला व्यापक स्वरूप देणे शक्य होणार आहे. विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातील किडनी विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मेडिकलमध्ये उपचारासाठी येतात. मात्र, त्यांना डायलिसिस करिता थांबावे लागते. त्यामुळे डायलिसिस सेंटर मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित झाल्यास रेफर रुग्णांना सेवा उपलब्ध होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु