जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने जुन्या औषधांच्या नावाने नवीन औषधे विकण्यास मनाई बंदी घातली आहे. घटक पदार्थ बदलल्यानंतरही औषधाची विक्री जुन्याच नावाने होत असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सर्व राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील औषध नियंत्रकांकडून बंदी आणण्यात यावी असा निर्णय घेतला आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने याबाबत प्रत्येक राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील औषध नियंत्रकांना पत्र लिहिले आहे. औषधांमधील घटक पदार्थ बदलून ती औषधे जुन्या नावाने विक्री करण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. काही औषध कंपन्या जुन्या औषधांमधील घटक पदार्थ बदलून त्या औषधाला जुन्याच नावाने बाजारात विकत असल्याचे केद्राच्या समितीला आढळून आले होते. यामुळे रूग्णांची दिशाभूल त्यांच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. औषधांमधील घटक पदार्थ बदलेले की रूग्णावर त्याचा परिणामही वेगळा होतो. त्यामुळे घटक पदार्थ बदलेले औषध जुन्या नावाने विकले आणि रूग्णाने ते घेतले तर त्याचा विपरीत परिणाम रूग्णाच्या आरोग्यावर होऊ शकतो, याचसाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु