राग मनात साठवणे वाईट, तो व्यक्त करा, ‘हे’ आहेत 6 फायदे

राग मनात साठवणे वाईट, तो व्यक्त करा, ‘हे’ आहेत 6 फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – राग मनातल्या मनात दाबून टाकण्याने खूप नकारात्मक परिणाम होतात. यामुळेच वरवर राग न येणारे, शांत दिसणारे आतून हललेले असतात, डिस्टर्ब झालेले असतात. यासाठी राग वेळेत व्यक्त केला पाहिजे. राग दाबणे वाईट असून राग व्यक्त करणे चांगले आहे. म्हणून राग व्यक्त करा. राग व्यक्त करण्याने अनेक प्रकारचे फायदे होतात, असे अमेरिका आणि रशियामधील मानसशास्त्रज्ञांनी रागावर केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.

हे आहेत फायदे

१. जर राग वेळीच व्यक्त झाला तर सकारात्मकता वाढते. ती व्यक्ती, ती परिस्थिती नकोशी वाटत नाही. परिस्थितीकडे, व्यक्तीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.

२. राग वेळीच व्यक्त झाल्याने रागाचे स्वरूप तीव राहात नाही. त्यामुळे राग व्यक्तही होतो आणि व्यक्ती जास्त दुखावली जात नाही. उलट राग व्यक्त केल्याने नातेसंबंध दृढ होत जातात. कडवटपणा राहात नाही. नाती पारदर्शक आणि मजबूत होतात.

३. राग व्यक्त केल्याने मन शांत राहाते. राग व्यक्त केल्याने झोपेवर, पचनावर आणि चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होत नाही. रक्तदाब वाढत नाही. त्वचेचे आजार होत नाहीत.

४. इतर नकारात्मक क्रिया करण्यास चालना मिळत नाही. राग मनात धुमसत ठेवल्याने खूप खाण्याची इच्छा होते, अस्वस्थ वाटते, मनस्ताप वाढतो, संताप वाढतो. हे टाळण्यासाठी राग आला तर तो व्यक्त करावा.

५. मानसिक आरोग्य चांगले राहते. अमेरिकन आणि रशियन मानसशास्त्रज्ञांच्या मते राग व्यक्त केल्याने आपल्याच चुका सापडतात.

६. राग ही भावना प्रेरणा देवू शकते. प्रयत्न करण्याची सवय वाढते. समोरच्याला चुका कळतात आणि तोही वेगाने कामाला लागतो.

७. राग साचून राहिल्यास त्याचे पर्यावसन हिंसेत होते. वेळीच राग व्यक्त न झाल्याने ही शक्यता कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु