उन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या

उन्हाळ्यात व्यायाम करताना ही काळजी घ्या

पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात व्यायाम करताना अधिक घाम येतो. घामामुळे शरीर डिहायड्रेट होतं. उन्हाळ्यात व्यायाम करताना तापमान आरोग्यावर परिणाम करू शकतं. यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत तापमान जास्त असल्याने या वेळेत व्यायाम करणं टाळावं. उन्हाळ्यात व्यायाम करण्याची योग्य वेळ ही सकाळची असते.

श्वेत रंगामुळे उष्णता परावर्तित होते आणि सुती कपड्यांमुळे घाम शोषला जातो. त्यामुळे सैल, सौम्य रंगाचे आणि सुती कपडे वापरा. उन्हाळ्यात त्वचेला सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे, ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण मिळतं. ढगाळ वातावरण असलं तरीदेखील त्वचेवर सूर्यकिरणांचा दुष्परिणाम होऊ शकतो. व्यायामाला जाण्यापूर्वी एक किंवा २ ग्लास पाणी प्यायला हवे.

तसेच सोबतदेखील एका बाटलीत पाणी घ्यावे. तहान लागली नसली तरी प्रत्येकी १५ मिनिटानं पाणी प्यावं. व्यायाम पूर्ण झाल्यानंतरही ग्लासभर पाणी प्यावं. घराबाहेर व्यायामाला जाण्यापूर्वी वातावरण कसं आहे ते तपासा. ओझोन आणि वायूप्रदूषण जास्त असल्यास तुमच्या फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो. त्यावेळी घरातच व्यायाम करणं फायदेशीर आहे. थकवा जाणवत असेल, चक्करसारखं वाटत असेल, मळमळत असेल तर व्यायाम तात्काळ थांबवणे हे हिताचे आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु