विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम : काही विद्यार्थ्यांनी आंब्याच्या पानांपासून मद्य तयार केले असून या मद्यात ८ ते १२ टक्के अल्कोहोलचे प्रमाण आहे. मात्र या मद्यामुळे डायबिटीजसह फॅट कमी करणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढू शकते, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. हा शोध लावणारे विद्यार्थी जीवाजी युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सेंटरचे आहेत.
आंब्याच्या पानांपासून मद्य तयार करण्याचा फॉर्मुला जेयूच्या हेल्थे सेंटरचे प्रभारी प्रा. बीबीकेएस प्रसाद आणि विद्यार्थीनी रूपाली दत्त यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला आहे. भास्कर डॉट कॉमने हे वृत्त दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आंब्याच्या पानापासून मद्य तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागला. हे मद्य ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि पेप्टॉन प्रोटीनच्या किण्वनपासून तयार करण्यात आले. हे मद्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखाद्या कंपनीसोबत फॉर्मुल्याचा एमओयू साइन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या मद्यात आंब्याच्या पानांमध्ये आढळणाऱ्या मँगो फेरीन तत्त्वांची महत्त्वाची भूमिका आहे. याने वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. आंब्याची पाने सतत उपलब्ध असल्याने हे मद्य कोणत्याही सीझनमध्ये तयार होऊ शकते. आंब्याच्या पानांमध्ये असलेल्या मँगो फेरीनमुळे डायबिटीससारखा आजार रोखला जाऊ शकतो. तसेच शरीरातील फॅट कमी होते. यात अ‍ँटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. यातील गॅलिक अ‍ॅसिड, पॅरासिटीन, कॅटाइचिन, इपि कॅटाइचिन शरीरातील पेशींना कमजोर होऊ देत नाही. एस्कॉर्बिक अ‍ॅसिडने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु