इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शारीरिक संबंधादरम्यान अनेक पुरूषांना इरेक्शन (ताठरता) ची समस्या होते. यामागे विविध कारणे असतात. यामुळे दोन्ही व्यक्तींच्या लैंगिक जीवनासह भावनिक नात्यावरही परिणाम होतो. पुरूषांमध्ये स्ट्रेसही अधिक वाढतो. तसेच नात्यात नकारात्मकताही येते. काही उपाय केल्यास व कारणे जाणून घेतल्यास ही समस्या सहज सोडवता येते.

इरेक्शनची समस्याही लाइफस्टाईल, स्ट्रेस, मेडिकल किंवा सिच्युएशनल व स्थितीशी संबंधित असू शकतात. ही समस्या जर दूर करण्यासाठी प्रथम आधी कारण शोधणे आवश्यक आहे. पौष्टीक आहार न घेणे, झोप पुरेशी न होणे, एक्सरसाइज न करणे, स्मोकिंग इत्यादी लाइफस्टाईलशी निगडीत सवयी सेक्स ड्राइव्हला प्रभावित करण्यासोबतच इरेक्शनमध्येही समस्या निर्माण करतात. यासाठी पौष्टीक आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यायाम करणे हे उपाय केल्यास काही दिवसात चांगला फरक दिसून येतो. कामाच्या अथवा अन्य तणावाचा मेंदूवर खूप परिणाम होतो. असा तणाव असल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे इरेक्शनसंबंधी समस्या होते.

तणाव कमी करण्यासाठी योगाचा आधार घेतल्यास ही समस्या दूर होते. इरेक्शनची समस्या सिच्युएशनलही असू शकते. बेडरूमची सेंटींग, शारीरिक संबंधावेळील पार्टनरची एखादी सवय, खोलीचे तापमान यामुळेही इरेक्शनमध्ये समस्या येऊ शकते. दोघांमध्ये काही समस्या असल्यास इच्छा असूनही शरीर संबंध ठेवता येत नाहीत. अशावेळी समुपदेशन घेतल्यास नाते सुधारते. आणि इच्छांमध्येही बदल होतो. इरेक्शनची समस्या कोणत्याही शारीरिक समस्येमुळेही येऊ शकते. अशावेळी डॉक्टरांची भेट घ्यावी. काही टेस्ट केल्यावर किंवा थेरपींच्या माध्यमातून ही समस्या दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु