पतीच्या मृत्यूचे दु:ख पचवून तिने घेतला अवयवदानाचा निर्णय

पतीच्या मृत्यूचे दु:ख पचवून तिने घेतला अवयवदानाचा निर्णय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अपघातात गंभीर जखमी झाल्याने नवी मुंबईच्या खारघरमधील एका व्यक्तीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. हे दु:ख समोर असतानाही या ४२ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीने पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे दोन रूग्णांना आवश्यक असलेले अवयव मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवी मुंबईतील खारघर येथील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीला अपघातात झाला. अपघातात या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना वाशीतल्या हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या व्यक्तीला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यांचे अवयव दान करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर त्यांच्या पत्नीने दोन्ही किडनी दान करण्यासाठी परवानगी दिली.

अवयवदानाची माहिती देताना हिरानंदानी रुग्णालयाचे फॅसिलिटी डायरेक्टर संदीप गुदुरू यांनी सांगितले की, ब्रेनडेड रुग्णांचे कुटुंब अवयवदानासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. ही चांगली बाबत आहे. जवळची व्यक्ती गेल्याचे दुख असतानाही काही कुटुंब अवयवदानाचा निर्णय घेत आहेत. या महिलेने घेतलेला निर्णयही धाडसी आहे. त्यांच्या निर्णयामुळे २ रूग्णाचा जीव वाचला आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु