खासगी रुग्णवाहिकांना मिळणार स्वतंत्र पार्किंग

खासगी रुग्णवाहिकांना मिळणार स्वतंत्र पार्किंग

आरोग्यनामा ऑनलाईन – मुंबईतील महापालिका रूग्णालयांबाहेर खासगी रुग्णवाहिकांची रांगच लागलेली असते. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच करावा लागतो. तसेच रूग्णालयात येत असलेल्या अन्य रूग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत असतो. यामुळे खासगी रूग्णवाहिकांच्या पार्किंगचा प्रश्न नेहमीच चर्चेत होता. यावर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने निर्णय घेतला असून आता खासगी रुग्णवाहिकांना स्वतंत्र पार्किगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रूग्णालयाबाहेर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. याबैठकीत हा निणर्य घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

खासगी रुग्णवाहिकांना मुंबई महापालिकेने स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्यास अन्य रुग्णवाहिकांचा रुग्णालयात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केईएम रुग्णालयात पालिकेच्या फक्त दोनच रुग्णवाहिका आहेत. तर रुग्णसेवेसाठी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि खासगी संस्थांच्या मिळून अनेक रुग्णवाहिका आहेत. केईएम, टाटा, वाडिया या तिन्ही रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी त्यात वाहतूक कोंडी यामुळे अनेक रुग्णवाहिकांना मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसते. एखादा गंभीर रुग्ण घेऊन स्टेशनवरून केईएम रुग्णालयात येण्यास १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे उपचारास विलंब झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

यासाठीच पालिकेच्या अतिरिक्त आय़ुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केईएम रुग्णालयात विशेष बैठकी घेण्यात आली. या बैठकीत सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु