माता मृत्यू दर रोखण्यासाठी लोक चळवळ राबवा- डॉ. हर्षवर्धन

माता मृत्यू दर रोखण्यासाठी लोक चळवळ राबवा- डॉ. हर्षवर्धन

पुणे: आरोग्यनामा ऑनलाईन -साधारण १५-२० वर्षाचा काळ पहिला तर महिलांची प्रसूती बाईच्या मदतीने घरीच होत होती. त्यामुळे प्रसूती दरम्यान महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक होते. गरोदर महिलांची नियमित तपासणी किंवा आरोग्य व्यवस्थित राहत नसल्याने महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू होत असे. परंतु शासनाच्या जननी सुरक्षा योजनेमुळे महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात जाऊ लागल्या.

आणि प्रसुतीदरम्यानच्या मृत्यूमध्ये घट होऊ लागली. तरीही अतिरक्तस्राव झाल्याने प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे माता मृत्यू दर रोखण्यासाठी चळवळ राबवा. असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन केले आहे.

दरम्यान डॉ. हर्षवर्धन यांनी माता, किशोरवयीन, नवजात आणि पोषणअवस्था या संदर्भात काल दिल्लीत आढावा घेतला. त्यावेळी स्त्रीरोग तज्न आणि आरोग्य कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. देशात गरोदर मातांचा मृत्यू होऊ नये. असे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यामुळे स्वस्थ्य भारत, सुदृढ भारत घडवण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी लोकचळवळ राबवा असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु