आता नागपूर पोलिसही तातडीच्या वेळी देणार सीपीआर

आता नागपूर पोलिसही तातडीच्या वेळी देणार सीपीआर

नागपूर : आरोग्यनामा ऑनलाइन – एखादी दुर्घटना घडली असता त्या ठिकाणी पोलिस प्रथम पोहचतात. अशा वेळी दुर्घटनाग्रस्तांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. परंतु, घटनास्थळी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने अथवा दुर्घटनाग्रस्ताला रूग्णालयात हलविण्यास उशीर झाल्यास प्राणावर बेतू शकते. अशावेळी योग्य उपचार मिळाल्यास रूग्णाला जीवदान मिळू शकते. यासाठी नागपुरच्या बारा हजार पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी नागपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.

पुढील महिन्यापासून नागपूर पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक झोननुसार पोलिसांची यासाठी निवड करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात पोलीस कॉस्टेबलना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नंतर ग्रामीण भागातील पोलिसांना व वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण दिले जाईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु