केरळमध्ये निपाहचा रुग्ण, २३ वर्षाच्या विद्यार्थ्याला लागण

केरळमध्ये निपाहचा रुग्ण, २३ वर्षाच्या विद्यार्थ्याला लागण

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केरळमध्ये पुन्हा जीवघेण्या निपाहची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यातच एका २३ वर्षांच्या विद्यार्थ्यामध्ये निपाह लक्षणे आढळून आल्याने त्याच्या रक्ताचे नमुणे पुण्यातील नॅशनल इस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एनआयव्हीने केलेल्या चाचणीत या युवकाला निपाहची लागन झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.

या विद्यार्थ्याच्या रक्ताची चाचणी यापूर्वी मनिपाल आणि केरळच्या प्रयोगशाळांमध्ये केली असता संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्याच्या रक्तात निपाहचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पुणे येथील अनआयव्हीमध्ये रक्ताचे नमुणे पाठविण्यात आले होते. मंगळवारी सकाळीच चाचणीचे निकाल समजले. या रुग्णाला एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, राज्य सरकारची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कोझीकोडे आणि मल्लापुरम येथे निपाहचे २२ रुग्ण आढळले होते. तर १२ जणांचा निपाहने बळी घेतला होता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु