झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही संकेत दिसून येतात. ते ओळखता येत असतील तर वेळीच डॉक्टरांकडे जाता येते. दरदरून घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा डाव्या हातात वेदना सुरू होऊन त्या मानेपर्यंत जाणे,अशी लक्षणे दिसून येतात. मात्र, झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आल्यास काहीच हालचाल करता येणे शक्य नसते. यासाठी संशोधकांनी, झोपेमध्ये असताना हृदय विकाराचा झटका येण्याच्या शक्यतेवर नजर ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबधित एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली झोपलेल्या व्यक्तीला स्पर्श न करता त्यांच्यावर नजर ठेवते. अशा अधुनिक तंत्रज्ञानामुळे झोपत जरी व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तरी त्याची सूचना मिळू शकणार आहे.

हृदय विकाराचा झटका आला असता व्यक्ती अचानक बेशुद्ध होते. त्यानंतर ही व्यक्ती अस्वस्थ होते. गूगल होम आणि अ‍ॅमेझॉन एलेक्सा या स्मार्ट स्पीकर्स किंवा स्मार्टफोनमध्ये एक नवीन तंत्रज्ञान विकसित केल्याने उपकरण जोरात श्वास घेण्याचा आवाज ओळखते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला त्रास होत असल्यास त्याची माहिती जवळच्या व्यक्तीला मिळू शकते. ही माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) या तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. परंतु, यासाठी या व्यक्तीच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती तरी असणे गरजेचे आहे.

वॉशिंगटन विश्वविद्यालयातील असोशिएट प्रोफेसर गोलाकोटा यांनी सांगितले की, अनेक लोकांच्या घरामध्ये स्मार्ट स्पीकर असतात आणि या उपकरणांमध्ये एक उत्तम क्षमता असते, ज्याचा फायदा हृदयविकाराच्या रूग्णांसाठी घेता येऊ शकतो. आम्ही एका संपर्करहित प्रणालीची कल्पना केली असून ही प्रणाली श्वास घेण्यासाठी होत असलेल्या त्रासाच्या कोणत्याही घटनेवर लक्ष ठेवते. यामुळे आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सावध करून सीपीआर देण्यासाठी सावध करते. आजूबाजूला कोणी नसल्यास हे उपकरण आपातकालीन नंबर्सवर फोन करून संबंधित व्यक्तीला त्रास होत असल्याची माहिती देते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु