पुण्यात एनएबीएच मान्यताप्राप्त पहिले रक्त साठवण केंद्र

पुण्यात एनएबीएच मान्यताप्राप्त पहिले रक्त साठवण केंद्र

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधील रक्त साठवण केंद्रला नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडरने (एनएबीएच) मान्यता दिली आहे. एनएबीएचचे मान्यताप्राप्त असलेले हे देशातील पहिले रक्त साठवण केंद्र ठरले आहे.
रुबी हॉल क्लिनिकमधील रक्त साठवण केंद्राला ही मान्यता देण्यापूर्वी एनएबीएचच्या अधिकाऱ्यांनी या रक्त साठवण केंद्राचे मूल्यांकन केले. सेंटरमधील सुविधा, तांत्रिक बाबी, प्रशासकीय कामगिरी, एनएबीएचच्या मानकांपेक्षा जास्त सुविधा आहेत का याची तपासणी अधिकाऱ्यांनी केली.
एनएबीएचने २०१२ साली रक्त साठवण केंद्रासाठी मानकाची यादी रूबी हॉलला दिली होती. त्याच वर्षी रुबी हॉल क्लिनिकमध्ये हे युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एनएबीएचच्या प्रोटोकॉलनुसार सेंटरची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला. २०१८ साली मान्यतेसाठी अर्ज केल्यानंतर ३ महिन्यांतच ही मान्यता मिळाली, असे रुबी हॉल क्लिनिकच्या रक्तपेढीतील रक्त संक्रमण सेवेच्या संचालिका डॉ. स्नेहल मजुमदार यांनी सांगितले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु