नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याकडे स्तनांबद्दल अगदी खुलेआम चर्चा होत नसली तरी प्रत्येक महिलेला आपले स्तन हे शेपमध्ये असलेले आवडते.  त्यासाठी नक्की काय करायला हवं यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. त्यामुळे स्तन, व्यक्तिमत्व अधिक आकर्षक करण्यासाठी फायदेशीर ठरतात. ज्या महिलांच्या स्तनांचा आकार लहान असतो त्यांच्यावर बरेचदा काही कपडे चांगले दिसत नाहीत. महिलांचे स्तन पुरुषांनाही आवडतात पण त्याहीपेक्षा महिलांना स्वतःला आपले स्तन सुडौल आणि आकर्षक असलेले जास्त चांगले वाटतात. स्तन वाढवण्यासाठी बाजारात अनेक क्रिम्स आणि इलाज आहेत पण त्याचबरोबर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. त्यामुळे स्तन वाढवण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय करू शकता.

१) महिलांच्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठी मेथी दाण्यांचा उपयोग होतो. यासाठी तुम्ही मेथीच्या पावडरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या स्तनांवर लावा. १५ मि. स्तनांवरील पेस्ट धुवा. असं दिवसातून २ वेळा करा.

२) स्तन वाढवण्यासाठी तुम्ही बडिशेपचादेखील वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही बडिशेपचे दाणे लव्हेंडर तेलामध्ये भाजा. हे दाणे पूर्ण लाल व्हायला हवेत. त्यानंतर हे थंड करून या तेलाने तुमच्या स्तनांवर मालिश करा.

३) सुडौल आणि आकर्षक स्तन मिळण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कांद्याच्या रसामध्ये मध मिसळून ही पेस्ट स्तनांना लावा आणि झोपा. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना हे धुवा.

४) शतावरी ही आयुर्वेदिक औषधी असून बऱ्याच गोष्टींवर याचा उपयोग होतो. महिलांच्या बऱ्याचशा समस्यांवर शतावरी पावडर हा चांगला उपचार आहे. ही पावडर नियमित खाल्ल्याने महिलांचे स्तन वाढण्यास मदत होते.

५) मुळा ही अशी भाजी आहे ज्यामुळे स्तनातील रक्तप्रवाह वाढतो. रक्तप्रवाह योग्य झाल्यास, तुमचे स्तन व्यवस्थित सुडौल आणि आकर्षक दिसतात. आपल्या जेवणात मुळा या भाजीचा समावेश करून घ्या आणि नियमित स्वरूपात याचं सेवन करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु