उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

 
उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा

आरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात रक्तदाबाचा त्रास झाल्यास तो अधिक धोकादायक असतो. यामुळे ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी कडक उन्हात जास्त वेळ जाऊ नये. कडक उन्हामुळे डिहायडड्ढेशनचाही धोका वाढातो. डोकेदुखी, चक्कर सारखा त्रास होतो. अशावेळी हाय बीपी असलेल्यांनी काळजी घेतली पाहिजे. हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब हा खूपच त्रासदायक असतो. याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो. उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरते.

दरवर्षी हाय ब्लड प्रेशरमुळे ७० लाख लोकांचा बळी जातो. जगातील सुमारे प्रत्येक तिसरी व्यक्ती या आजाराने त्रस्त आहे. २०२५ पर्यंत जगात १.५ बिलियनपेक्षा जास्त लोकांना हाय ब्लडप्रेशर होऊ शकतो. याने डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते, किडनीच्या रक्तवाहिन्या लहान-मोठ्या होऊ शकतात, हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा ही धोका होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हाय बीपी असणाऱ्या रूग्णांनी उन्हाळ्यात अतिशय कमी प्रमाणात मीठाचे सेवन करावे. मुळ्याची भाजी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मूळा शिजवून किंवा कच्चा खाल्ल्याने शरीराला मिनरल्स आणि पोटॅशिअम मिळतात. त्यामुळे मूळाचे सेवन नेहमी करावे.

नियमीतपणे कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहतो. यात असलेल्या क्योरसेटिनमुळे हृदयरोगापासून बचाव होतो. तसेच लसणामध्ये असलेल्या एलिसीनमुळे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढते आणि मांसपेशीला आराम मिळतो. ब्लड प्रेशरच्या डायलोस्टिक आणि सिस्टोलिक सिस्टीममध्ये आराम मिळतो. यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी खावी. लसूण सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्या दूर होते. लसणीमुळे रक्त घट्ट होत नाही. रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. हाय ब्लड प्रेशरचे एक मुख्य कारण म्हणजे रक्त घट्ट होणे किंवा रक्ताच्या गाठी होणे. रक्त घट्ट झाल्याने रक्तप्रवाह हळू होतो. याने नसांवर दबाव पडतो. ब्राउन राइसमध्ये मीठ, कोलेस्ट्रोल आणि चरबीचे प्रमाण कमी असल्याने हा राइस हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी लाभदायक ठरतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु