दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नकळत आपण दिवसभरात काही चुका करतो, त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. काही चुका अशा असतात ज्यामुळे अकाली वृद्धत्व येते. अशा चूका टाळल्यास तारुण्य दिर्घकाळ आपण टिकवून ठेवू शकतो. या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळव्यात याविषयी आपण माहिती घेवूयात.

अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, पूर्ण झोप न घेतल्याने अकाली वृद्धत्व येऊ शकते. रात्री ७-८ तासांची झोप घेतली नाही तर तणाव, हृदयाशी संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाबाची समस्या होते. यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. सतत तणावात राहिल्याने शरीरात काही असे हार्मोन्स तयार होतात ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे चेहऱ्यावर अवेळी सुरकुत्या येतात. एकाच वेळी अनेक काम केल्याने ऊर्जा जास्त लागते आणि ताण वाढतो. यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने जेवणाचे पचन होत नाही. अशावेळी लठ्ठपणा वाढतो.

याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. दिवसभरात ७ किंवा ८ ग्लासपेक्षा कमी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होऊ शकत नाही. अशा वेळी स्किन ड्राय होते ज्यामुळे सुरकुत्या येतात. तसेच सकाळची न्याहारी न केल्याने दिवसभर थकवा आणि अशक्तपणा राहतो. याचा त्वचेवर परिणाम होतो. आहारात दूध, दही, पनीर, हिरव्या भाज्या, अंडी, मासे, चिकन, मटन सारखे पदार्थ न घेतल्याने शरीराला आवश्यक न्यूट्रिशन्स मिळत नाही. यामुळे अकाली वृद्धत्व येते. सनस्क्रीन न लावल्याने सूर्य किरणांचा थेट त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचेचा रंग आणि मऊपणा कमी होतो. रोज सकाळी व्यायाम न केल्याने शरीर निरोगी राहत नाही. यामुळे लठ्ठपणा, अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बध्दकोष्ठतेची समस्या होते. अशावेळी अवेळी म्हातारपण येते. तसेच दारू, गांजा, सिगारेट आणि डड्ढग्सचा नशा केल्याने बॉडीमध्ये कॉर्टिसोल नामक हार्मोन तयार होते. हे ताण वाढवते आणि अकाली वृद्धत्व येते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु