ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाला कुलूप ; रुग्णांचे हाल

ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाला कुलूप ; रुग्णांचे हाल

आरोग्यनामा ऑनलाईन – वरणगाव येथील ग्रामीण रूग्णालय विशेष आणि विविध कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय बनत आला असतांनादेखील त्याच अनुषंगानेच रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थीत नसल्याने नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. देवर्षी घोषाल आणि डॉ. क्षितीजा हेंडवे यांची मागील वर्षापासून नियुक्ती करण्यात आली असून कर्मचारी वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे. रूग्णालय हे महामार्ग क्रमांक सहा आणि मुंबई नागपूर लोहमार्गालगत व वरणगाव शहराला ७० खेडे लागुन असल्याने वरणगाव येथे शासनाने मंजूर केले.

शहरात किंवा परिसरात दैनंदिन दुर्दैवी अपघाती घटनांचे प्रमाण अधिक असते. त्याच अनुषंगाने रविवार किंवा सुटीचा वार असूनदेखील आरोग्य विभागाकडून अत्यावश्यक म्हणून अतिरीक्त डॉक्टर, परिचारिका अशा स्टाफची व्यवस्था केली आहे. मात्र येथील वैद्यकिय अधिकारीच देवर्षी घोषाल ह्या विना अर्ज सुटीवर आहेत. तर दुसरे उप वैद्यकीय अधिकारी क्षितीजा हेंडवे दोन महिन्याच्या वैद्यकीय रजेवर असल्याने रूग्णालय वाऱ्यावर आहे. दररोज सकाळी आर. बी. एस. के. विभागाचे डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी केली जात असली तरी दुपारी १२ वाजेनंतर कोणीही डॉक्टर उपस्थीत राहात नसल्याने अपघाताच्या रुग्णांचे हाल होत आहेत; असा प्रकार गेल्या वर्षभरापासून दररोज सुरू असूनसुद्धा जिल्हा आरोग्य विभागाला माहिती नसल्याचे नवलच आहे. तरी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु