‘LED’ च्या प्रकाशाने डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम, स्वास्थ्य अधिकाऱ्यांचा इशारा

‘LED’ च्या प्रकाशाने डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम, स्वास्थ्य अधिकाऱ्यांचा इशारा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या सोशल मिडियाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. तरुण मुले-मुली सतत मोबाईल, कम्प्युटवर अॅक्टिव्ह असतात. यामध्ये तरुणच नाही तर अनेक तास लोक वाचन करतात. त्याचबरोबर ८ तास कम्प्यूटरवर काम करत असतात. यांचाही सहभाग आहे. सतत कम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांवर एलईडीची लाईट पडत असते. त्यामुळे डोळ्यांची आग होणे. डोळे दुखणे, डोळ्यांना थकवा जाणवणे, सुज येणे, कमी झोप लागणे अशा समस्या जाणवू लागतात.

फ्रांन्समधील एजंसी खाद्य, पर्यावर आणि व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा (ANSES) यांनी एका रिपोर्टमधून सांगिल्यानुसार, संशोधनातून सिद्ध झाले की, एक तीव्र आणि शक्तीशाली एलईडी प्रकाश ‘फोटो-टॉक्सिक’ असतो. हे डोळ्यांमधील रेटिनाच्या पेशींना हानि पोहचवतात. एलईडी लाइटमुळे डोळ्यांना झालेले नुकसान बरे करता येऊ शकत नाही. त्याचबरोबर याचा परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवरही होऊ शकतो.

एका रिपोर्टने शिफारस केली आहे की, संशोधनातून सिद्ध झालेल्या बाबींमधून हे सिद्ध झालेले असले तरिही, आणखी खोलवर संशोधन करुन याच्या सर्व बाबी तपासणे गरजेचे आहे.

फ्रांन्समधील सरकारी आरोग्य देखरेख संस्थेने या आठवड्यात इशारा दिला असून त्यांनी सांगितले की, वीज वाचविण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या एलईडी लाइटमुळे डोळ्यांच्या रेटिन्याला नुकसान होऊ शकते. झोपण्यातही अडथळा निर्माण होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु